नवी दिल्ली : झारखंडमधील ब्रह्मदिहा कोळसा खाणपट्ट्याचे सन १९९९ मध्ये एका खासगी कंपनीस वाटप करताना झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या ‘रालोआ’ सरकारमधील कोळसा राज्यमंत्री दिलिप रे यांच्याविरुद्ध फौैजदारी खटला चालणार आहे.सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सकृद्दर्शनी तथ्य दिसते असे नमूद करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी गुन्हेगारी कट रचणे व विश्वासघात करणे या गुन्ह्यांसाठी खटला चालविण्यासाठी आरोप निश्चित केले. रे यांच्याखेरीज प्रदीप कुमार बॅनर्जी व नित्यानंद गौतम हे कोळसा खात्याचे तत्कालिन वरिष्ठ अधिकारी व ज्यांना खाणपट्टा दिला गेला त्या कॅस्ट्रॉन कंपनीचे संचालक यांच्यावर हा खटला चालेल. खटला ११ जुलैपासून सुरु होईल व दिलीप रे हे सध्या ओडिशात आमदार असल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार खटल्याची सुनावणी रोजच्या रोज होईल, असेही न्यायाधीश पराशर यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोळसा प्रकरण; माजी रालोआ मंत्र्यावर खटला
By admin | Published: April 27, 2017 1:07 AM