शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

तटरक्षक दल सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:35 AM

भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे २00८ साली मुंबईत घुसून केलेल्या हल्ल्यानंतर तटरक्षक दलाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हेलिकॉप्टर, विमाने आणि अन्य उपकरणे विकत घेण्यात येणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्याकडे झालेल्या बैठकीत तटरक्षक दलासाठीच्या खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली.समुद्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात २0२२ पर्यंत १७५ बोटी व ११0 विमानांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सागरी संपत्तीचे संरक्षण, सागरी पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे.>7516किलोमीटरचा सागरी किनारा भारताला लाभला असून, त्यात १३८२ बेटे आहेत.तटरक्षक दलाच्या १३0 युनिटकडे सध्या ६0 बोटी, १८ हॉव्हरक्राफ्ट, ५२ छोट्या इंटरसेप्ट बोटी, ३९ डॉनियर टेहळणी विमाने, १९ चेतक हॅलिकॉप्टर व चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.>वसई किनाºयावर नजरवसई-विरारच्या किनाºयावर सुरक्षेसाठी गस्त वाढविण्यात आली असून, सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.याशिवाय सर्व लँडिंग पॉइंट्सवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते.नियमितपणे स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात येते.