Drug Haul News: अंदमानला लागून असलेल्या समुद्रात भारतीय तटरक्षक दलाने भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. संरक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका मासेमारी करणाऱ्या बोटीत पाच टन इतके ड्रग्ज आढळून आले. तटरक्षक दलाकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
परदेशातून भारतात येत असलेला ड्रग्जचा मोठा साठा सोमवारी जप्त करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाने अंदमान आणि निकोबार लागून असलेल्या बंगालच्या उपसागरात ही कारवाई केली.
संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मासेमारी करणाऱ्या बोटीत पाच टन ड्रग्ज आढळून आले. तटरक्षक दलाने जप्त केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा साठा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाला संशयित बोटीबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर ही बोटीची माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तटरक्षक दलाच्या ड्रोनियर २२८ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीचा समुद्रात शोध घेण्यात आला.
बोट सापडल्यानंतर तिची झाडाझडती घेण्यात आली. त्यात पाच टन ड्रग्जचा साठा आढळून आला. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.