ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 13 - काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे , तब्बू आणि निलमला २५ जानेवारी पूर्वी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. काळवीट शिकरप्रकरणी 25 जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे. सलमान खानसह अन्य आरोपींचे स्टेटमेंन्ट घेणार आहेत. 1998 मध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींग वेळी सलमानसह अन्य पाच कलाकारांनी काळवीट शिकार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणात 2006 मध्ये सलमानविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यावर र्निबध घातले होते. राज्य सरकारने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1998 मध्ये काळविटाच्या शिकारप्रकरणी सलमानवर गुन्हा दाखल झाला होता व त्याला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काळविटाची शिकार करणो हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे.
दरम्यान, परवाना संपलेले शस्त्र बाळगणे आणि वापरणे याबद्दल राजस्थानच्या वन खात्याने जोधपूर पोलिसांकडे ऑक्टोबर १९९८ मध्ये सलमान खानविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याची सुनावनी 18 जानेवारी रोजी होणार आहे. या खटल्या सलमान खान दोषी ठरल्यास त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.