नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याचा निर्णय आयोगाने बदलला असून यापुढे सभागृह विसर्जित झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होणार आहे. या निर्णयाचा प्रभाव येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर दिसणार आहे.
एसआर बोमाई खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काळजीवाहू सरकारला केवळ रोजचे कामकाज चालविण्याचा अधिकार आहे. मात्र, नीती संबंधी निर्णय घेण्यापासून त्यांनी लांब राहिले पाहिजे. निवडणूक आयोगाने या निर्णयाची सर्व राज्यांच्या कॅबिनेट सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, वेळेपूर्वी विधानसभा विसर्जित झाली असल्यास त्या वेळेपासूनच आचारसंहिता लागू होईल. ही आचारसंहिता नवीन सरकार शपथ घेईपर्यंत सुरु राहणार आहे.
हा आदेश काळजीवाही सरकारसोबतच केंद्र सरकारलाही लागू राहणार आहे. यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही कोणत्याही योजना घोषीत करू शकणार नाही.
या निर्णयाचा परिणाम तेलंगाना सरकारवर होणार आहे. कारण तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 6 सप्टेंबरला विधानसभा विसर्जित केली होती.