शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 8:32 PM

कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे.

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये दोन महिने चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामींना पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेससह त्यांच्याच पक्षातील आमदारांनी सरकारविरोधात बंड पुकारत मुंबई गाठली होती. बरेच प्रयत्न करूनही या 15 आमदारांचे मन वळविण्यात जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले होते. शेवटी कुमारस्वामींना राजीनामा द्यावा लागला होता. यामागे भाजपाचे य़ेडीयुराप्पा यांचा हात होताच, पण सिद्धरामय्यांचीही फूस असल्याची चर्चा होती. 

कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि जेडीएसचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. सिद्धरामय्यांनी ट्विट करताना म्हटले की, चार दशकांच्या राजकीय अनुभवानंतरही मी गिधाडाला पोपट समजण्याची चूक केली आणि आघाडी केली. यानंतर कुमारस्वामींनी प्रत्यूत्तर देताना म्हटले की, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या संमतीने मी मुख्यमंत्री बनलो होतो. हीच गोष्ट सिद्धरामय्यांना पटली नाही, यामुळे सरकार जास्त काळ टिकले नाही. 

यानंतर हा वाद काही शमन्याचे नाव घेत नाहीय. सिद्धरामय्या यांनी हुबळीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, कुमारस्वामी समजूतदारपणे बोलत नाहीत. त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि बंधू जी टी देवेगौडा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हैसूर आणि चामराजनगरमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मत देण्याचे आदेश दिले होते. आता पोटनिवडणुका आल्या आणि ते नाटक करू लागलेत. यावेळी सिद्धरामय्या यांनी एका लोकप्रिय कन्नड गीताचा हवाला दिला. या गीतामध्ये मालक एका पोपटाचे पालन पोषण करतो, मात्र नंतर तोच पोपट विश्वासघात करतो. सिद्धरामय्या यांनी या गीतातून कुमारस्वामींच्या आरोपांना उत्तर दिले. कुमारस्वामींना तुमकूरमधून एच डी देवेगौडा, मंड्यामधून निखिल कुमारस्वामी आणि कोलारमधून काँग्रेसचे उमेदवार मुनियप्पा यांच्या लोकसभेतील पराभवाला सिध्दरामय्यांना जबाबदार धरले होते. 

सिद्धरामय्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितले होते की, लोकसभेनंतर एकही सेकंदासाठी कुमारस्वामींचे सरकार चालू देणार नाही, असे कुमारस्वामींना चेन्नापटनामध्ये सांगितले होते. सिद्धरामय्या यांनी राजकारण शिकविणाऱ्य़ा  देवेगौडांचाच विश्वासघात केला आहे. मला नाही माहिती की सरकार का पडले, पण मी सिद्धरामय्यांचा पाळलेला पोपट नाही. रामनगरच्या लोकांनी मला सांभाळले आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारण