नवी दिल्ली/श्रीनगर : उत्तर भारतातील थंडीची लाट कायम आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागांमध्ये बुधवारी तापमानात मोठी घट झाली. काश्मीर खोऱ्यातील पर्वतीय भागात पुन्हा बर्फवृष्टी झाल्याने आणि मैदानी प्रदेशात पाऊस बरसल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पारा खाली घसरला. खोऱ्यात पुढील २४ तासांत आणखी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
उत्तरेत थंडीची लाट कायम
By admin | Published: December 24, 2015 12:10 AM