नवी दिल्ली : दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट आली असून दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ढगाळ वातावरण असल्याने दिवसाचेही तापमान वाढत नाही. यामुळे आज रात्री दिल्लीमध्ये 1.7 डिग्री तापमान नोंदविण्यात आले.
दिल्लीतील रस्त्यावर धुके पसरल्याने दृष्यमानताही कमी झाली आहे. यामुळे सकाळपासून चार विमाने इतरत्र वळविण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये आज सकाळी 8.30 वाजता विविध भागांत तापमानाची नोंद करण्यात आली. सफदरगंजमध्ये 2.4, पालम 3.1, लोधी रोड 1.7, आया नगर 1.9 अशा तापमानाची नोंद झाली.
सरत्या वर्षाला निरोप देताना देशभरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1907 मध्ये दिवसाचे सरासरी तापमान 17.3 अंश सेल्सिअस होते. नववर्षाचे स्वागत करताना काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 1 आणि 2 जानेवारीला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागानुसार 3 जानेवारीपर्यंत थंड हवेच्या ठिकाणांवर जोरदार पाऊस होणार आहे. राजस्थानच्या फतेहपूरमध्ये रात्रीचे तापमान 0 ते 3 अंशावर तर सीकरमध्ये उणे होत आहे.
पश्चिमी दिशेकडून हवेचा जोर असल्याने दिल्लीच्या आकाशात ढग दाटलेले आहेत. ज्यामुळे सूर्याचे उन खाली येत नाहीय. यामुळे दिवसाचेही तापमान वाढत नाहीय. यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास 1901 नंतर दुसरा डिसेंबर थंडीचा असणार आहे. 18 डिसेंबरला दिल्लीतील तापमान 12 अंशावर जाऊन पोहोचले होते. हे गेल्या 22 वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमान होते.