शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

मध्य प्रदेशातील पेंचच्या प्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:59 AM

वृद्धावस्था व आतड्यात केसांचा गोळा फसल्याने निधन झाल्याचा अंदाज

नागपूर : ‘कॉलरवाली’ म्हणून लोकप्रिय असलेली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिवनी (मध्य प्रदेश) जंगलातील टी-१५ वाघिणीचे निधन झाले. वयाच्या साडे १६ व्या वर्षी कर्माझरीच्या काेर वनक्षेत्रातील बुढादत्त नाला, रय्यकसा कॅम्पअंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात, शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ती मृतावस्थेत आढळली. तशी ती वृद्धावस्थेत पाेहोचली हाेती. मात्र, स्वत:चे शरीर चाटण्याच्या सवयीमुळे पाेटात गेलेल्या केसांचा गाेळा जमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मागील आठवड्यापासून टी-१५ वाघिणीवर देखरेख ठेवणे सुरू हाेते. मात्र, शनिवारी जंगलात तिची हालचाल दिसून न आल्याने वनविभागाच्या पथकाने शोध सुरू केला. तेव्हा घटनास्थळी ती मृतावस्थेत आढळली. कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. एका वेळी पाच शावकांना जन्म देण्याचा विक्रम काॅलरवाली वाघिणीच्या नावे आहे, शिवाय सर्वाधिक शावकांना जन्म देण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. यापूर्वी राजस्थानच्या रणथंबाेर व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘मछली’ वाघिणीच्या नावावर २३ शावकांना जन्म देण्याचा विक्रम हाेता. ...म्हणून ‘काॅलरवाली’ नावाने प्रसिद्ध२००८ साली तिच्या देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडियो कॉलर लावला हाेता. त्यामुळे ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या या वनक्षेत्रात लाेकप्रिय असलेली पाटदेवची टी-४ वाघीण ही काॅलरवाली वाघिणीची मुलगी आहे. ही वाघीण आता तिच्या पाच शावकांसह दिसून येते.२९ बछड्यांना दिला जन्ममध्य प्रदेशचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुब्रमण्यम सेन यांनी सांगितले, ही वाघीण मे, २००८ ते २०१८ पर्यंत आठ वेळा गराेदर राहिली आणि २९ शावकांना जन्म दिला. काॅलरवालीने मे, २००८ साली पहिल्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला हाेता. यानंतर ऑक्टाेबर, २००८ मध्ये चार शावक, ऑक्टाेबर, २०१० साली पाच शावक, मे, २०१२ साली तीन शावक, ऑक्टाेबर, २०१३ मध्ये तीन शावक, एप्रिल, २०१५ मध्ये चार शावक, २०१७ साली तीन आणि २०१८ मध्ये ४ शावकांना जन्म दिला.