शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:39 PM

बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.

Gas Geyser Leak ( Marathi News ) : सोईसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. मात्र कधीकधी हीच उपकरणे माणसाच्या जीवावर उठतात. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली असून बाथरुममध्ये अंघोळ करताना गॅस गिजरमुळे एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बदायू इथं ही घटना घडली असून मेघा शर्मा असं मृत मुलीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदायू जिल्ह्यातील बुधबाजार येथील भूपालदास मेमोरियल डिग्री कॉलेजचे संस्थापक दिवगंत अरुण शर्मा यांची मुलगी मेघा शर्मा ही अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. नुकतीच ती आपल्या आजी-आजोबांच्या घरी गेली होती. रविवारी दुपारच्या सुमारास ती अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेरच आली नाही. त्यामुळे तिचे आजोबा रामनिवास शर्मा यांनी घरातील कामगार महिलेला याबाबत विचारणा केली. त्यानंतर सदर महिला मेघाचा शोध घेत असताना बाथरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं.

बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर तो उघडला न गेल्याने मेघाच्या आजोबांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.

दरम्यान, या घटनेनं मेघाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात