शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

एकत्रित निवडणुका २४ नव्हे,२०२९ पासून; काय होतील बदल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 8:24 AM

विधि आयोग; विधानसभांचा कार्यकाळ वाढविण्याचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विधि आयोग विद्यमान विधानसभांचा कार्यकाळ वाढवून किंवा कमी करून २०२९ पासून लोकसभा निवडणुकांसोबत सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या सूत्रावर काम करत आहे, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी सरकारने आधीच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यामुळे विधि आयोगाने राष्ट्रीय आणि राज्यांच्या निवडणुकांसाठी सध्याच्या शिफारशींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही समाविष्ट करण्यासही सांगितले जाऊ शकते.मतदारांचा त्रास वाचणार

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची व्यवस्था केल्यावर, दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी मतदारांना मतदान केंद्राला एकदाच भेट द्यावी लागावी, यासाठी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. 

एक समान मतदारयादीसाठी यंत्रणासूत्रांनी सांगितले की, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक समान मतदारयादी सुनिश्चित करण्यासाठी कायदा आयोग एक यंत्रणा तयार करत आहे, जेणेकरून खर्च कमी करता येईल आणि मनुष्यबळाचा वापर जवळपास समान कार्यासाठी केला जाऊ शकतो जो सध्या निवडणूक आयोग आणि विविध राज्य निवडणूक आयोगांद्वारे केला जात आहे. मात्र, काही मुद्यांचे निराकरण होणे बाकी असल्याने एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत कायदा आयोगाचा अहवाल तयार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

त्रिस्तरीय निवडणुका एका वर्षात दोन टप्प्यांत?nत्रिस्तरीय निवडणुका एका वर्षात दोन टप्प्यांत घ्याव्यात. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ शकतात आणि दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, अशी शिफारस विधि आयोग करू शकतो. nदेशातील विविध हवामान परिस्थिती लक्षात घेऊन हा एक व्यावहारिक दृष्टिकोन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय होणार?सध्या विधानसभा, लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे मार्ग सुचवण्याचे काम आयोगाचे आहे; पण समितीला लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी कशा घ्याव्यात, याची शिफारस करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन