शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

या अन् करा आमची नार्को, कुस्तीपटूंचे आव्हान : लाइव्ह दाखविण्याचीही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 8:02 AM

ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची नार्को चाचणीचे आव्हान कुस्तीपटूंनी सोमवारी स्वीकारले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते बजरंग पुनिया म्हणाले की, आम्ही सर्वजण कोणत्याही चाचणीसाठी तयार आहोत, मात्र ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवे. नार्को चाचणी लाइव्ह असावी जेणेकरून संपूर्ण देश प्रश्नोत्तरे ऐकेल.

ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.ब्रिजभूषण यांनी रविवारी फेसबुक पोस्ट करत म्हटले होते की, मी माझी नार्को टेस्ट, पॉलिग्राफी टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार आहे, पण माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही हीच टेस्ट करावी.  मंगळवारी इंडिया गेटवर कुस्तीपटू कँडल मार्च काढणार आहेत. त्यामुळे दिल्लीत मंगळवारी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. 

खाप पंचायतींचे समर्थनnब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायतीही आल्या आहेत. पैलवानांच्या समर्थनार्थ आज, मंगळवारी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनासमोर खापांची महिला महापंचायत होणार आहे. nयामध्ये देशभरातील महिलांशिवाय खाप आणि शेतकरी नेतेही पोहोचणार आहेत. ही महिला महापंचायत पैलवानांना सोबत घेऊन जो काही निर्णय घेईल तो सर्व खापांना मान्य असेल.

कोण काय म्हटले? आम्ही नार्को चाचणीला सामोरे जाण्यास तयार आहोत, परंतु त्यांनी (ब्रिजभूषण) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील चाचणीला सामोरे जावे, अशी आमची इच्छा आहे जी राष्ट्रीय वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केली जाईल.    - बजरंग पुनिया

आम्हाला कोणते प्रश्न विचारले जात आहेत ते पाहू इच्छितो. त्यांनी माझी आणि विनेशची नार्को टेस्ट करायला सांगितली आहे, पण फक्त आम्ही दोघीच का, ज्या मुलींनी तक्रार दाखल केली आहे त्यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी.    - साक्षी मलिक

ब्रिजभूषणला अनेक माध्यमे ते किती चांगली व्यक्ती आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रसारमाध्यमांनी असे करू नये. ते स्टार नसून लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी आहेत.    - विनेश फोगाट

या आंदोलनामुळे खेळाचे नुकसान होत आहे. लवकरात लवकर सुनावणी झाली पाहिजे. आज आखाड्यात मुली आल्या होत्या, पण सगळ्यांची निराशा झाली. खेळाडूंची संख्या कमी होत आहे. पालक आपल्या मुलांना परत घेऊन जात आहेत.      - ब्रिजभूषण