शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 15:57 IST

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा यांना परत येण्याचे जाहीर आवाहन केलं आहे.

Prajwal Revanna Obscene Video Case: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.  लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच प्रज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला. मात्र पीडितांच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्ज्वल रेवण्णा यांना भारतात येण्याचं आवाहन केलं आहे.

कर्नाटकमधील हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ऐन लोकसभा निवडणुतकीच्या काळातच हे व्हिडीओ समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले होते. त्यानंतर रेवण्णा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. आता प्रज्वल रेवण्णांचे काका एचडी कुमारस्वामी यांनी त्यांना परत येण्याचे आवाहन केलं आहे.

"प्रज्ज्वल रेवण्णा यांना मी आवाहन करतो की, त्यांनी लवकरात लवकर भारतात यावं आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावं. चोर-पोलिसांचा हा खेळ अजून किती दिवस चालणार? तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या”, असे एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, प्रज्वल रेवण्णा यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर एचडी कुमारस्वामी यांनी माफी देखील मागितली होती. मी पुन्हा एकदा माझ्या माता-भगिनींची जाहीर माफी मागतो. त्यांची मानसिक वेदना मी समजू शकतो. ही नक्कीच अस्वीकारार्ह बाब आहे. या घटनेमुळे आमची मान शरमेने झुकली आहे,” असे कुमारस्वामींनी म्हटलं होतं.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर बोलताना माजी पंतप्रधान देवगौडा यांनी प्रज्ज्वल रेवण्णावर गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार जी काय शिक्षा असेल ती द्यावी, असे म्हटलं आहे. 'प्रज्ज्वल रेवण्णा सारख्या गुन्हेगाराला मोकळे सोडता कामा नये. मात्र आपला मुलगा आणि प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर लावलण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत,' असे एचडी देवेगौडा  यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालkumarswamyकुमारस्वामीCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक