शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

अनिवासींनो परत या : मोदी

By admin | Published: January 09, 2015 1:39 AM

भारतीय दिनाचे औपचारिक उद््घाटन करताना त्यांनी परदेशस्थ भारतीयांच्या ‘घरवापसी’त असलेले स्वारस्य आवर्जून व्यक्त केले.

मोठ्या संधींचा दिला दाखला : महात्मा गांधींच्या कृतीचा हवालागांधीनगर : जगभरात सर्वदूर पसरलेल्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांच्या मायदेशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात सहकार्य करावे असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे नागरिक हे मोठे भांडवल असून येथे अनेक संधी त्यांची वाट पाहात असल्याचे प्रतिपादन केले. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या १३ व्या प्रवासी भारतीय दिनाचे औपचारिक उद््घाटन करताना त्यांनी परदेशस्थ भारतीयांच्या ‘घरवापसी’त असलेले स्वारस्य आवर्जून व्यक्त केले. कोणे एके काळी विपरीत परिस्थितीत तुमच्या पूर्वजांनी उपजीविकेसाठी भारताबाहेर पाऊल टाकले असले तरी आता आपला देश अतिशय भक्कमपणे उभा असून येथे अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे मोदींनी प्रवासी भारतीयांचे स्वागत करताना नमूद केले. भारतवंशाच्या नागरिकांचा वैश्विक संदर्भ हा आमच्याकरिता एक मोठे भांडवल आहे. आम्ही त्याला जेवढे प्रोत्साहन देऊ तेवढी जगातील आमची उपस्थिती भक्कम होईल असेही ते म्हणाले. जगात भारताविषयी वाटणारे प्रेम किती आहे याची जाणीव आपल्याला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्ताव स्वीकारताना आल्याचे मोदी म्हणाले. जगाने भारताविषयी जे प्रेम दर्शविले आहे ते दुसऱ्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समृद्धीमुळे नसून, मूल्यांवरील त्यांच्या श्रद्धेमुळे व सांस्कृतिक परंपरेमुळे आहे असे मत मोदींनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधींजींच्या विशेष स्टॅम्प आणि नाण्याचे अनावरणक करण्यात आले.