"एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी", कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:30 PM2021-03-25T14:30:35+5:302021-03-25T14:41:03+5:30

Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs : सर्व 225 लोकांची मोनोगॅमी चाचणी झाली पाहिजेत, त्यानंतर प्रत्येकाचे सत्य बाहेर येईल, असे के. सुधाकर म्हणाले.

Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs | "एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी", कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

"एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी", कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

googlenewsNext
ठळक मुद्देसेक्स व्हिडिओच्या आरोपावरून राजीनामा देणारे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या समर्थनार्थ मंत्र्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

नवी दिल्ली : राज्यातील सर्व आमदारांची मोनोगॅमी चाचणी (Monogamy Test) केली पाहिजे, यामुळे हे समजले की किती आमदारांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहे, असे कर्नाटकचे (Karnataka) आरोग्यमंत्री के. सुधाकर (K Sudhakar) यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या विधानानंतर कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर आता आरोग्यमंत्र्यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, माझ्या विधानामुळे जर कोणी दुखावले असले तर मला याबद्दल दुख: व्यक्त करतो. (Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs)

दरम्यान, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावरील आरोपांबद्दल बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी असे भाष्य केले. 'काँग्रेस आणि विरोधी पक्षातील नेते जे स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सादर करीत आहेत.जर त्या सर्व 225 आमदारांची मोनोगॅमी चाचणी केली, तर किती जणांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत, हे समजेल.  मी सुद्धा या चाचणीसाठी तयार आहे. प्रत्येकाचे चारित्र्य कळेल', असे के सुधाकर म्हणाले. 

याचबरोबर, के. सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सी.एच.डी. कुमारस्वामी यांचे नाव घेत सदसद्विवेकबुद्धी योग्य असेल तर त्यांनी हा प्रस्ताव मान्य करावा व चाचणीसाठी तयार राहावे, असे के. सुधाकर म्हणाले. तसेच, जर आमदारांना कशाची भीती वाटत नसेल तर त्यांनी चाचणी करण्यापासून पळून जाऊ नये, यासाठी पुढे यावे. या चाचणीसाठी मी तयार आहे आणि आता लोक हे आव्हान स्वीकारतील की नाही ते पाहावे लागेल. सर्व 225 लोकांची मोनोगॅमी चाचणी झाली पाहिजेत, त्यानंतर प्रत्येकाचे सत्य बाहेर येईल, असे के. सुधाकर म्हणाले.

(Karnataka Sex CD Scandal : आक्षेपार्ह सीडी प्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचं झालं अपहरण, पालकांनी केला गंभीर आरोप)

दुसरीकडे, काँग्रेसने येडियुरप्पा सरकारच्या सहा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मंत्र्यांपैकी के. सुधाकर यांच्या नावाचाही यात समावेश होता. दरम्यान, सेक्स व्हिडिओच्या आरोपावरून राजीनामा देणारे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या समर्थनार्थ मंत्र्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

(मुख्यमंत्री येदीयुरप्पांना हटवावचं लागेल, कर्नाटक भाजपा आमदारांनं सांगितलं राजकारण)

Web Title: Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.