आ. जाधव यांना तात्पुरता जामीन-
By admin | Published: December 18, 2014 10:39 PM
आ. जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीनपोलीस अधिकार्यास मारहाण प्रकरणनागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने आ. हर्षवर्धन जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. मारहाणीची ही घटना ...
आ. जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीनपोलीस अधिकार्यास मारहाण प्रकरणनागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने आ. हर्षवर्धन जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. मारहाणीची ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हॉटेल प्राईडमध्ये घडली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले होते. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाकरे यांच्या भेटीसाठी कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर होती. कदम यांनी दार उघडून मंत्र्यांना आत घेतले होते. मात्र, जाधव यांना बाहेर थांबण्यास सांगून त्यांनी दार लावून घेतले होते. परिणामी आ. जाधव चिडले होते. ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे विशेष सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी आ. जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करताच जाधव यांनी त्यांच्याच कानशिलात लगावली.पराग जाधव यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी कालच आ. जाधव यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२३, ३५३, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. अटक टाळण्यासाठी आ. जाधव यांनी आज न्यायालयात धाव घेऊन आपले वकील ॲड. आर. एस. अकबानी आणि ॲड. अतुल मोदी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जातच त्यांनी तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची विनंती केली. ती न्यायालयाने मंजूर केली. न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांच्या अर्जावर सरकारला नोटीस जारी करून २९ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे. याच दिवशी अटकपूर्व जामीन कायम होण्यावर सुनावणी होणार आहे.