कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'लोकलसाठी व्होकल' होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. "भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे," असं मोदी यावेळी म्हणाले.
लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे या; पंतप्रधान मोदींचं आवाहन
By जयदीप दाभोळकर | Published: January 02, 2021 1:26 PM
PM Narendra Modi : शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत असल्याचं पंतप्रधानांचं मत
ठळक मुद्देआजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील, पंतप्रधानांचा विश्वासविद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे.