नवी दिल्ली : जगातील सर्वात माेठ्या लाेकशाही असलेल्या आपल्या देशाची लाेकसभा निवडणूक म्हणजे लाेकशाहीचा महाेत्सव असून प्रत्येक मतदाराने त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना त्यांनी आयाेगाने निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.
राजीव कुमार यांनी सांगितले की, ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या नावाने आयाेगाने निवडणुकीचा महाेत्सवाची तयारी केली आहे. ‘माझे पहिले मत देशासाठी’, या टॅगलाईनने माेहिम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना मतदानाच्या प्रक्रीयेत सहभागी हाेण्यासाठी प्राेत्साहन देण्यात येणार आहे. देशात निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयाेगाने प्रचंड परिश्रम घेतले आहे. मतदारांनीही या महाेत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले.
मतदारांचा उत्साह वाढविणार
शहरी आणि युवा मतदारांचा अनेक ठिकाणी निरुत्साह दिसून येताे. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते. या मतदारांनी मतदान करावे, यासाठी त्यांना प्राेत्साहन देण्यात येणार आहे. मतदान करा मग सुट्टीचा आनंद घ्या. काेणताही मतदार मागे सुटणार नाही, ही माेहिम त्यासाठी राबविण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर सुविधा
मतदारांना मतदान केंद्रांवर चांगल्या सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व गर्भवती महिला मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, हेल्पडेस्क, पुरेसा प्रकाश, सावली राहील याची काळजी घेण्यात येईल.
२०१९ लाेकसभा: मतदारांनी कसा दिला होता देशाला कौल?
२०१९च्या लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्त्वात भाजपप्रणित एनडीएने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळविला. भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त प्रथमच ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या.
- गेल्या निवडणुकीत काय झाले?
एनडीए ३५४ / युपीए ९३ / इतर ९६
प्रमुख पक्षांना मिळालेल्या जागा
- भाजप ३०३
- काँग्रेस ५२
- डीएमके २२
- तृणमूल २२
- वायएसआर काँग्रेस २२
- शिवसेना १८ (विभाजनापूर्वी)
- जेडीयू ११
- बसप १०
- बीजेडी ७
- राष्ट्रवादी काँग्रेस ५ (विभाजनापूर्वी)
२०२४ लाेकसभा
- ९६.८ कोटी- एकूण मतदार
- ४७ कोटी- स्त्री मतदार
- ४९.६ कोटी- पुरुष मतदार
- १.८२ कोटी- प्रथमच मतदार
- १९.७४ कोटी- १८-२९ वयोगटातील
- ८८.४ लाख- अपंग मतदार
- २.१८ लाख- १०० वर्षांपेक्षा जास्त
- ४८ हजार- तृतीयपंथी
- १०.५ लाख- मतदान केंद्रे
- ५५ लाख- ईव्हीएम
गेल्या ११ निवडणुकांमध्ये धनशक्ती राेखली
निवडणुकीत धन आणि बलाचा वापर केला जाताे. ताे राेखण्याचे आयाेगापुढे माेठे आव्हान असते. गेल्या दाेन वर्षांमध्ये झालेल्या ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये माेठ्या प्रमाणात राेकड आयाेगाने जप्त केली आहे. त्याचीही माहिती राजीव कुमार यांनी दिली.
- ३,४०० काेटी रुपयांची राेकड जप्त
- हा आकडा २०१७-१८मधील निवडणुकीच्या तुलनेत ८३५% जास्त
- ६,२९५% एवढी सर्वाधिक वाढ मेघालयमध्ये झाली
अशी झाली जप्ती
राज्य रक्कम वाढ
- राजस्थान ७०४ काेटी ९५१ टक्के
- तेलंगणा ७७८ काेटी ५०६ टक्के
- गुजरात ८०२ काेटी २,८४७ टक्के
- त्रिपुरा ४५ काेटी २,४३९ टक्के
- कर्नाटक ३८४ काेटी ३५८ टक्के
- छत्तीसगड ७८ काेटी १,१४२ टक्के
- मेघालय ७४ काेटी ६,२९५ टक्के
- नागालॅंड ५० काेटी १,०६३ टक्के
- मध्य प्रदेश ३३२ काेटी ८९८ टक्के
- हिमाचल प्रदेश ५७ काेटी ५३४ टक्के
- मिझाेरम १२३ काेटी २,६९५ टक्के
यंदा निवडणुकीत यावर नजर
- जिथेही हेलिकाॅप्टर आणि चार्टर्ड विमान उतरेल, तेथे त्यातील सामानाची तपासणी करण्यात येईल.
- रेल्वे स्थानकांवरही तपासणी हाेईल.
- साेशल मीडियावर नजर ठेवणार खाेट्या बातम्यांचे प्रसारण राेखण्याचा प्रयत्न राहिल.
- काेणत्याही प्रकारच्या अफवा पसरू देणार नाही.
चुकीच्या माहितीचा प्रसार टाळावा
- राजकीय पक्षांनी साेशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करावे.
- फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर कायद्यानुसार कठाेर कारवाई करण्यात येईल.
सात टप्प्यांमध्ये अशी होईल निवडणूक प्रक्रिया
निवडणूक कार्यक्रम पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा सहावा टप्पा सातवा टप्पा
- अधिसूचना प्रसिद्ध २० मार्च २८ मार्च १२ एप्रिल १८ एप्रिल २६ एप्रिल २९ एप्रिल ७ मे
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च (बिहार २८मार्च) ४ एप्रिल १९ एप्रिल २५ एप्रिल ३ मे ६ मे १४ मे
- अर्जांची छाननी २८ मार्च (बिहार ३०मार्च) ५ एप्रिल(जम्मू/काश्मीर ६ एप्रिल) २० एप्रिल २६ एप्रिल ४ मे ७ मे १५ मे
- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च ८ एप्रिल २२ एप्रिल २९ एप्रिल ६ मे ९ मे १७ मे
- मतदान १९ एप्रिल २६ एप्रिल ७ मे १३ मे २० मे २५ मे १ जून