शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी एकत्र या! राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक : पक्षाचे निरीक्षक आसिफ शेख यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन
By admin | Published: March 05, 2016 11:49 PM
जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.
जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट तसेच पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी डॉ.आसिफ शेख जळगावात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.डॉ.शेख पुढे म्हणाले की, केंद्रासह राज्यात सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सत्ताधार्यांविरोधात प्रचंड खद्खद् आहे. हेच वातावरण आपल्यासाठी पोषक आहे. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस तीव्र स्वरुपाची आंदोलने छेडणार आहे. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.विकासात्मक दृष्टिकोनातून खाविआला पाठिंबाजळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने खान्देश विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. जळगाव शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात विकासकामे झाली पाहिजेत, जळगावचा विकास साधला जावा, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचे डॉ.आसिफ शेख म्हणाले.पक्षात कोणतेही मतभेद नाहीतमध्यंतरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पक्ष टीकेचा धनी ठरला होता. परंतु पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने हे मतभेद दूर करण्यात आले. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. मतभेद असण्यात काही गैर नाही; परंतु मनभेद असता कामा नये. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद नाहीत. म्हणून जिल्ासह राज्यात राष्ट्रवादीचे पक्षसंघटन अतिशय मजबूत आहे. आगामी काळात येणार्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेख यांनी केले.