'काँग्रेसमध्ये तुमची अवहेलना..; आमच्यासोबत या', अठावलेंची अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 09:39 PM2024-07-31T21:39:49+5:302024-07-31T21:40:18+5:30

काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी पक्ष हायकमांडवर नाराज असल्याची चर्चा आहे.

come with us, Ramdas Athawale's open offer to Adhir Ranjan Chaudhary | 'काँग्रेसमध्ये तुमची अवहेलना..; आमच्यासोबत या', अठावलेंची अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर

'काँग्रेसमध्ये तुमची अवहेलना..; आमच्यासोबत या', अठावलेंची अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर

Ramdas Athawale : केंद्रातील एनडीए सरकारचा सहकारी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बुधवारी (30 जुलै) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला दिला. यासोबतच आठवलेंनी त्यांना एनडीएमध्ये येण्याची किंवा रीपाईमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली.

'काँग्रेसमध्ये तुमची अवहेलना आणि अपमान होत असेल, तर तुम्ही आमच्यासोबत या. अधीर रंजन चौधरी हे लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून पराभूत झाल्यामुळे त्यांना अशी वागणूक मिळत आहे. काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे संतप्त झालेले अनेक जण भाजपमध्ये गेले, आता तुम्हीही काँग्रेस सोडा,' असे आवाहन रामदास आठवले यांनी अधीर रंजन यांना केले.

काय म्हणाले अधीर रंजन चौधरी?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी हे पक्ष हायकमांडवर नाराज असल्याचं वृत्त आहे. मंगळवारी (30 जुलै) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 'नुकत्याच झालेल्या बैठकीत मला माजी अध्यक्ष म्हणून संबोधण्यात आले आणि याची माहितीही मला आधी देण्यात आली नव्हती. माजी अध्यक्ष म्हणणे माझ्यासाठी धक्कादायक होते,' अशी प्रतिक्रिया अधीर रंजन यांनी दिली.

 

Web Title: come with us, Ramdas Athawale's open offer to Adhir Ranjan Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.