नवी दिल्ली - अंतराळाच्या दुनियेत ज्याना रस आहे, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 14 जुलैपासून भारताच्या आकाशात सी/2020 एफ-3 नावाचा एक अनोखा धूमकेतू तब्बल 20 दिवस पाहता येऊ शकतो. हा धूमकेतू 14 जुलैपासून रोज 20 मिनिटांपर्यंत लोक पाहू शकतील. या अनोख्या धूमकेतूला NEOWISE, असे नावही देण्यात आले आहे.
ओडिशाच्या प्लॅनेटरीअमचे उपसंचालक डॉ. सुभेंदू पटनायक यांनी सांगितले, नासाच्या निअर अर्थ वाइड-फिल्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोरर (NEOWISE) टेलीस्कोपच्या सहाय्याने मार्चमध्येच हा धूमकेतू शोधण्यात आला होता. असा शक्यता आहे, की हा धूमकेतू 22-23 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. एवढेच नाही, तर तो पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला वायव्येकडील आकाशात दिसेल.
पटनायक यांच्या मते, 14 जुलैपासून NEOWISE धूमकेतू वायव्य आकाशात स्पष्टपणे दिसेल. पुढील 20 दिवसांपर्यंत सूर्यास्तानंत 20 मिनिटांपर्यंत तो रोज दिसेल. लोक याला उघड्या डोळ्यानेही पाहू शकतील. त्यांच्या मते, 14 जुलैला हा धूमकेतू वायव्येकडील आकाशात खालच्या बाजूला दिसेल. तो रोज सायंकाळी आकाशात वरच्या दिशेला जाईल. यानंतर तो सर्वांना दीर्घकाळ दिसू शकेल.
पटनायक म्हणाले, ऑगस्टपासून हा धूमकेतू दिसणे हळू-हळू बंद होईल. टेलीस्कोप आणि दुर्बीणीच्या सहाय्याने तो जुलै महिन्यात स्पष्टपणे दिसू शकतो. NEOWISE सध्या पृथ्वीपासून जवळपास 20 कोटी किलोमीटर दूर अंतराळात आहे. 22 जुलैला तो आपल्या ग्रहाच्या सर्वात जवळ येईल. तेव्हा याचे अंतर 10.3 कोटी किलो मीटर एवढे असेल.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर