'कमांडो' कुत्रा करणार नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:57 PM2022-09-27T19:57:29+5:302022-09-27T19:59:39+5:30
नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण 'कमांडो' कुत्रा करणार आहे.
नवी दिल्ली : देशात 17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील देश नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत. चित्त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. अशा परिस्थितीत या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार विशेष कमांडो कुत्र्यांची मदत घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी खास स्नायफर डॉग्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा कुत्रा चित्तांचे रक्षण करणार आहे. या 8 चित्त्यांना शिकारीपासून वाचवण्यासाठी कमांडोकुत्रा सज्ज झाला आहे. खरं तर असे कमांडो कुत्रे या प्रकारच्या कामासाठीच असतात. त्यांना याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
Cats and Dogs: 'Super Sniffer' dog squad to protect Namibian cheetahs from poachers at Kuno
— ANI Digital (@ani_digital) September 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/NaLZ9ggTZK#SuperSniffer#Namibian#Cheetah#KunoNationalParkpic.twitter.com/DbGuj6Mift
दरम्यान, 1952 साली देशात चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारत सरकारने नामिबियातून 8 चित्त्यांची ऑर्डर दिली होती. या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी खास स्नायफर डॉग्स मागवण्यात आले आहेत. या विशेष कमांडो कुत्र्यांचे काम सर्व चित्त्यांना सुरक्षित ठेवणे आणि शिकारीपासून त्यांचे संरक्षण करणे आहे.
पाच मादी व तीन नर चित्ते
नामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली.