शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भारतातील एजंटांना कमिशन?

By admin | Published: April 06, 2016 10:32 PM

पनामा प्रकरणात भारतातील एजंटांना कमिशन दिल्याची चर्चा आहे. बँक नोट प्रिंटिंग करणाऱ्या डी ला रुई या कंपनीने भारतातील एजंटांना १५ टक्के कमिशन दिल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : पनामा प्रकरणात भारतातील एजंटांना कमिशन दिल्याची चर्चा आहे. बँक नोट प्रिंटिंग करणाऱ्या डी ला रुई या कंपनीने भारतातील एजंटांना १५ टक्के कमिशन दिल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील हॅम्पशायर येथे या कंपनीचे कार्यालय आहे. त्यांनी नवी दिल्लीतील काही व्यापाऱ्यांना हे कमिशन देऊ केले. व्यापाऱ्यांनी या बदल्यात भारतातून व्यवसायासाठी त्यांना मदत करायची, असा हा करार होता. या माध्यमातून डी ला रुई या कंपनीने भारतातून असे काही टेंडर मिळविले होते. आणखी नावे आली समोर पनामा प्रकरणात भारतातून आणखी नावे समोर आली आहेत. ब्रिटिश आइसलँडमधील कंपन्यांत ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे, अशा उद्योजकांची ही नावे : सतीश के. मोदी (मोदी ग्लोबल इंटरप्रायजेसचे अध्यक्ष), मोतुरी श्रीनिवास प्रसाद (हैदराबादेतील उद्योजक), भावनासी जया कुमार (हैदराबादेतील उद्योजक), भास्कर राव (उद्योजक), प्रीतम बोथरा आणि श्वेता गुप्ता (कोलकात्यातील उद्योजक), भंडारी अशोक रामदयालचंद (अहमदाबादमधील उद्योजक), संजय पोखरीयाल (डेहराडूनमधील उद्योजक), प्रसन्ना व्ही. घोटगे आणि वामन कुमार (कर्नाटकातील व्यावसायिक), प्रदीप कौशिकराय बच (वडोदरातील रहिवासी), राहुल अरुणप्रसाद पटेल (अहमदाबादमधील उद्योजक), जॉर्ज मॅथ्यू (तिरुवअनंतपूरममधील सीए). दरम्यान, यातील अनेकांनी बेकायदेशीर असे काही केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)> कागदपत्रे विदेशातील सर्व्हरद्वारे हॅक झाल्याचा दावा1 पनामा सिटी : विदेशातील सर्व्हरने आमच्या कंपनीला हॅक केले गेले, असे गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या स्थापनेसाठी सल्ला देणाऱ्या मोसॅक फोन्सेका कंपनीने म्हटले. विदेशातील गुंतवणुकीबाबत ११.५ दशलक्ष कागदपत्रे (पनामा पेपर्स) उघड झाल्यानंतर चर्चेत आलेल्या या कायदा कंपनीच्या संस्थापकांपैकी रॅमोन फोन्सेका यांनी कंपनीने पनामाच्या सरकारी वकिलांकडे गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार दिल्याचे सांगितले.2 फोन्सेका म्हणाले, ‘यासंदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्यात कोणीही आमची कंपनी हॅक झाल्याबद्दल चकार शब्दही बोलत नाही.’ ‘एएफपी’ने दूरध्वनीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फोन्सेका म्हणाले की, ‘आम्ही तक्रार दाखल केली असून विदेशात असलेल्या सर्व्हरद्वारे आमची कंपनी हॅक करण्यात आली, असे तांंत्रिक अहवाल आमच्याकडे आहेत.’ कोणत्या देशातून हॅक करण्यात आले याचे नाव त्यांनी सांगितले नाही.3 आपली संपत्ती जमा करण्यासाठी विदेशात कंपन्या सुरू करण्यासाठी मोसॅक फोन्सेकाची मदत मोठमोठ्या लोकांनी घेतली होती. यासंदर्भातील ११.५ दशलक्ष कागदपत्रे कंपनीच्या कॉम्प्युटर सिस्टीममधून मिळविण्यात आल्याबद्दल फोन्सेका यांनी हळहळ व्यक्त केली. ते म्हणाले, ‘गोपनीयता हा मानवाधिकार नाही हे जगाने आधीच कसे स्वीकारले हे काही आम्हाला समजत नाही.’ पनामा पेपर्स उघड झाल्यामुळे पनामाच्या आर्थिक सेवा देणाऱ्या क्षेत्राला फार वाईट धक्का बसला आहे. गुप्त आर्थिक व्यवहारांसाठी पनामा हे केंद्र बनल्याचा आरोप पनामा सरकारने फेटाळला असून द आॅर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-आॅपरेशन अँड डेव्हलपमेंटला (ओईसीडी) पाठविलेल्या पत्रात आरोप ‘अन्यायकारक आणि भेदभाव’ करणारे असल्याचे म्हटले आहे. पनामाचे उपपरराष्ट्रमंत्री लुईस मिग्युएल हिन्कॅपी यांनी मंगळवारी ओईसीडीचे प्रमुख अँजेल गुरिया यांना हे कठोर भाषेतील पत्र पाठविले.