शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रुग्णालयाच्या समस्या निराकरणासाठी समिती महासभा : खुल्या जागा ताब्यात घेण्याचे प्रशासनाला दिले आदेश

By admin | Published: March 30, 2016 10:21 PM

जळगाव : मनपा दवाखान्यांबाबत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी भाजपा गटनेते डॉ.अश्वीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत करण्यात आला.

जळगाव : मनपा दवाखान्यांबाबत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी भाजपा गटनेते डॉ.अश्वीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत करण्यात आला.
मनपा दवाखाने विभागांतर्गत असलेल्या दवाखान्यांमधील प्रसूतीगृह बंद करून केवळ श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर येथेच प्रसूतीगृह सुरू ठेवण्याच्या विषयावर भाजपाने तसेच राष्ट्रवादीतील काही सदस्यांनीही विरोध दर्शविला.
भाजपा गटनेते डॉ.अश्वीन सोनवणे यांनी सांगितले की, लोकांना त्यांच्या भागात वैद्यकीय सुविधा मिळावी, त्यांचे हाल होऊ नयेत, या उद्देशानेच तत्कालीन नपाने शहराच्या वेगवेगळ्या भागात दवाखाने बांधले. आता हे दवाखाने बंद करून शाहू रुग्णालयात केंद्रीकरण करणे कितपत योग्य आहे? एखाद्या रुग्णाच्या जिवाचे बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? प्रशासनाने योग्य नियोजन केले तर सर्व दवाखाने चालविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. प्रसूती कक्ष बंद केल्यास इतर दवाखाने नाममात्र सुरू राहतील, असा आरोप केला.
उज्ज्वला बेंडाळे यांनी किती पदे रिक्त आहेत? असा सवाल केला.
त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष ठुसे यांनी मनपा रुग्णालयांमध्ये सध्या ४ एमबीबीएस डॉक्टर्स आहेत. मात्र शासन नियमानुसार ७ बेडसाठी १ डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र शाहू रूग्णालयात ४० बेड, डी.बी.जैन रुग्णालयात २५ बेड, चेतनदास मेहता रुग्णालयात १५ बेड असल्याने १२ एमबीबीएस डॉक्टर्सची आवश्यकता असताना केवळ ४ डॉक्टर्सवर कारभार सुरू असल्याचे सांगितले.
ती का भरली गेली नाहीत? अशी विचारणा केली असता तो केवळ नियम असून पदे मंजूर करून घ्यावी लागतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली. खाविआचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मानधनावर डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. तर डॉ.अश्वीन सोनवणे यांनी आधीच गोरगरिबांना मनपा रुग्णालयातून घाबरवून सिव्हीलमध्ये पाठविले जात असल्याचा आरोप केला. विष्णू भंगाळे यांनी अनेक डॉक्टरांनी मानसेवी तत्त्वावर सेवेची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत निर्णय घ्यावा, असे सुचविले. मिलिंद सपकाळे यांनी बाहेरगावाहून रुग्ण येतात. त्यांना त्या-त्या भागात सोय होते. त्यामुळे ही रुग्णालयांमधील सेवा बंद न करण्याची मागणी केली. तर कैलास सोनवणे यांनी असोदा रस्ता परिसरात रुग्णालयासाठी मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी, आपण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत प्रयत्न करून रुग्णालयासाठी शासनाकडून मदत मिळवू असे सांगितले. तर अनंत जोशी यांनी जर एकाच रुग्णालयात सेवा देण्यात येणार असेल तर गिरीश महाजन यांनी दिलेल्या रुग्णवाहिकांपैकी दोन रुग्णवाहिका मनपासाठी मागून घ्याव्यात, अशी मागणी केली.
हेतू वेगळाच?
भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी दवाखाने बंद करीत एकाच ठिकाणी नेण्यामागील उद्देश सेवेत सुधारणा करणे आहे की बंद दवाखान्यांच्या जागेवर कॉम्प्लेक्स उभारणे आहे? असा सवाल केला. भाजपाचेच रवींद्र पाटील यांनी या प्रस्तावावर प्रशासनाचा अभिप्राय का नाही? अशी विचारणा केली. तर राष्ट्रवादीच्या गायत्री शिंदे यांनीही डी.बी.जैन रुग्णालयात प्रसूती विभाग सुरूच ठेवण्याची मागणी केली.
मात्र महापौरांनी रुग्णालयांबाबत जर काही समस्या निर्माण होत असतील तर त्याबाबत डॉ.अश्वीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी. ही समिती ३० दिवसांत अहवाल देईल, असे सांगत प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दवाखाने सफाईसाठी महिला कर्मचारी
स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी मनपाच्या युनिट कार्यालयांतर्गत अनेक महिला कर्मचारी असून त्यांना काहीही काम नसल्याने रिकाम्या बसून असतात. त्यांना दवाखान्यांमध्ये वर्ग करून सफाईचे काम देण्याची सूचना केली.
---- इन्फो----
ओपनस्पेस ताब्यात घेण्याचे आदेश
आयत्यावेळच्या विषयात खुल्या जागा मनपाच्या नावावर नसल्याने त्यावर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर कैलास सोनवणे यांनी अनेकांनी तर ओपनस्पेसचे खळे प्लॉट पाडून विक्री करून टाकल्याचे सांगितले. तसेच अतिक्रमण होत असल्याचे सांगितले. महापौरांनी ओपनस्पेसला मनपाचे नाव लावून घेण्याची तसेच अतिक्रमण काढण्याची सूचना केली. अमर जैन यांनी या ओपनस्पेस ताब्यात घेण्याची सूचना करण्याची मागणी केली. त्यानुसार मनपाच्या ओपनस्पेस ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना महापौरांनी प्रशासनास केली.