शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

खासदारांच्या वेतनवाढीवर समिती फेरविचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2015 11:14 PM

खासदारांचे वेतन व भत्ते याबाबत विचार करीत असलेली संयुक्त संसदीय समिती येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत आपल्या अनेक शिफारशींवर फेरविचार करण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : खासदारांचे वेतन व भत्ते याबाबत विचार करीत असलेली संयुक्त संसदीय समिती येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत आपल्या अनेक शिफारशींवर फेरविचार करण्याची शक्यता आहे. खासदारांचे वेतन, मतदारसंघ व कार्यालय भत्त्यात १०० टक्के वाढ करण्याच्या समितीच्या प्रस्तावावर चौफेर टीका करण्यात येत आहे.समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही आणि खासदारांचे वेतन व भत्ते वाढविण्याच्या संदर्भात अद्याप निर्णयही घेतलेला नाही, असे या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.पुढच्या सोमवारी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असे आदित्यनाथ म्हणाले. खासदारांच्या अनेक मागण्या मान्य करण्यास ही समिती अनुकूल होती. या मागण्यांमध्ये वेतन, मतदारसंघ आणि कार्यालयीन भत्त्यात १०० टक्के वाढ तसेच माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये ७५ टक्के वाढ करण्याचा समावेश आहे. तथापि या मुद्यावर आता मोठा वाद निर्माण झाला आहे आणि अनेक राजकीय पक्षांनी या वेतनवाढीच्या प्रस्तावावर प्रखर टीका केली आहे. त्यामुळे या प्रस्तावावर फेरविचार केला जात आहे आणि संसदीय समिती आपल्या काही शिफारशी मागे घेण्याचीही शक्यता आहे. काही प्रस्तावांना सरकारनेही पाठिंबा दिलेला नाही. या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे समितीला जरा विलंबानेच निर्णय घ्यायला पाहिजे, असे संसदीय समितीच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)