- संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशात एकाच पेमेंंट कार्डने बस, रेल्वे, मेट्रो, आॅटो, क्रूझ एवढेच काय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवेचेही पेमेंट याद्वारे देता येईल. हे मोबिलिटी पेमेंट कार्ड डेबिट-क्रेडिट कार्डचेही काम करील. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) अमिताभकांत यांनी येत्या दोन ते तीन महिन्यांत हे कार्ड लोकांसाठी उपलब्ध होईल, असे म्हटले. यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय तांत्रिक आणि डाटा सुरक्षेवर काम करीत आहे. माहिती व तंत्रज्ञान सचिव अजय साहनी म्हणाले की, याबाबतचे काम वेगाने केले जात आहे. आम्ही फक्त देवाण-घेवाणसाठी प्लॅटफॉर्म तयार करीत आहोत असे नाही तर डाटा सुरक्षेबद्दलही कार्य केले जात आहे. अमिताभ कांत यांनी हे कॉमन कार्ड अमूक एकाच राज्यात किंवा शहरातच चालेल, अशी अडचण असणार नाही. हे देशव्यापी कार्ड असेल. त्यामुळे एका ठिकाणचा व्यक्ती दुसऱ्या राज्यात किंवा शहरातही ते वापरू शकेल,असे सांगितले.
तीन महिन्यांत येणार कॉमन मोबिलिटी कार्ड; नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:12 AM