नवी दिल्ली: भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटलींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. अरुण जेटली अर्थमंत्री असताना वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. 'जीएसटी लागू करण्यात अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. भारतीय कर रचनेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक असलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीत जेटलींचं मोठं योगदान होतं,' अशा शब्दांत अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याचा गौरव केला.अर्थ मंत्रालयानं ट्विटसोबत काही आकडेवारी दिली आहे. त्यात जीएसटी लागू होण्यापूर्वी गृहपयोगी वस्तूंवर आकारला जाणारा कर आणि आताचा आकारण्यात येणाऱ्या जीएसटीची तुलना केली आहे. केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर आधी २९.३ टक्के इतका कर लागत होता. मात्र जीएसटी लागू झाल्यापासून आता या वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागतो, अशी आकडेवारी अर्थ मंत्रालयानं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:43 PM