शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

"या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 1:42 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

नवी दिल्ली - 'भारत जोडो आंदोलना'च्या पार्श्वभूमीवर काही कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शन करण्यात आले. यावेळी शेकडो लोक येथे जमले होते. तसेच, यावेळी काही आक्षेपार्ह सांप्रदायिक घोषणाही देण्यात आल्या, असा आरोप आहे. यावर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. (Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons)

यासंदर्भात ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, "गेल्या शुक्रवारी द्वारका येथे हज हाऊसविरोधात एक 'महापंचायत' बोलावण्यात आली. हस्ब-ए-रिवायत, या पंचायतीतही मुस्लीम विरोधी घोषणा देण्यात आल्या. जंतर मंतर मोदींच्या महालापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. काल तेथे 'जब मुल्ले काटे जाएंगे..' सारख्या वाईट घोषणा देण्यात आल्या."

ओवैसी म्हणाले, "या गुंडाच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? यांना माहीत आहे, की मोदी सरकार यांच्या पाठीशी उभे आहे. 24 जुलैला भारत सरकारने रासुका (NSA)अंतर्गत दिल्ली पोलिसांना कुण्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार दिला होता. तरीही दिल्ली पोलीस शांतपणे तमाशा पाहत उभे होते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की न्याय आणि कायदेशीर कारवाईची मागणी करणेही मजाक बनले आहे. यावर लोकसभेतही चर्चा व्हायला हवी. मी, या मुद्द्यावर लोकसभेच्या नियमानुसार स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे."

मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक

'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावाने एकत्र आले होते लोक -पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावाने एकत्र आले होते. लोकांना एकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता.  जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनू फाउंडेशनचे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

यासंदर्भात बोलताना अश्विनी उपाध्याय म्हणाले, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषणाबाजी केली, त्यांचा आमच्या संघटनेशी काहीही संबंध नाही. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJantar Mantarजंतर मंतरHinduहिंदूMuslimमुस्लीमAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन