Communal Voilence In Rajasthan:राजस्थानमध्ये पुन्हा एकदा जातीय तणावाचे प्रकरण समोर आले आहे. हनुमानगड जिल्ह्यात बुधवारी रात्री विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) स्थानिक नेत्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. सध्या विहिंप नेत्याला बिकानेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील नोहरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते सतवीर सहारन यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सतवीर सहारनचे काही साथीदारही जखमी झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण हनुमानगढच्या नोहर येथील मंदिरासमोर झाले. येथील काही तरुण अनेकदा महिलांची छेड काढत असे. यावर सतवीरने त्या तरुणांना हटकल्यामुळे वाद सुरू झाला. यावेळी हल्लेखोरांनी सतवीरच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
विहिंप कार्यकर्त्यांचा चक्काजामया घटनेनंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नोहर रावतसर रस्ता अडवला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. हनुमानगडचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती हाताळली.
परिसरातील इंटरनेट सेवा बंदआरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा येथून हलणार नाही, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर रात्री उशिरापासून नोहर, भद्रा आणि रावतसरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन परिसरात फ्लॅग मार्च काढत आहे. अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.