नवी दिल्ली : राष्टÑा-राष्टांतील तसेच समाजा-समाजातील खोलवर रुजलेले आणि धार्मिक व पूर्वग्रहांवर आधारित संघर्ष टाळण्यासाठी संवाद हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.मोदी म्हणाले की, २१ व्या शतकातील जग हे एकमेकांशी जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून असलेले आहे. या जगासमोर दहशतवादापासून ते हवामान बदलापर्यंत जी जी काही आव्हाने आहेत, त्या सर्वांवर आशियातील सर्वांत प्राचीन संवाद आणि चर्चा या मार्गाने मार्ग काढला जाऊ शकतो, असा मला विश्वास आहे. कठिणातल्या कठीण समस्येवर संवाद आणि चर्चेद्वारे मार्ग निघू शकतो, असा विश्वास प्राचीन भारतीय परंपरतेत आहे. मी याच परंपरेतून घडलो आहे. यांगून येथे सुरू असलेल्या ‘संवाद : संघर्ष टाळणे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे याविषयीचा जागतिक पुढाकार’ या विषयावरील दुसºया परिषदेला मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश पाठविला होता. त्यात त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.
‘संवादातूनच संघर्षावर मात शक्य’ - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 11:45 PM