छोट्या पुढार्याने साधला आत्महत्याग्रस्त मुलांशी संवाद
By admin | Published: January 25, 2016 12:10 AM
वाघोली : अण्णा हजारे आणि नाना पाटेकर आपले आदर्श असून आपण या देशाचे वारसदार आहोत त्यामुळे घरात दु:खाचा डोंगर जरी कोसळला असला तरी शिक्षणाच्या हिमतीवर शेतकर्याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करू असा दिलासा छोटा पुढारी असलेल्या घनश्याम दरोडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना मार्गदर्शन करताना दिला.
वाघोली : अण्णा हजारे आणि नाना पाटेकर आपले आदर्श असून आपण या देशाचे वारसदार आहोत त्यामुळे घरात दु:खाचा डोंगर जरी कोसळला असला तरी शिक्षणाच्या हिमतीवर शेतकर्याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करू असा दिलासा छोटा पुढारी असलेल्या घनश्याम दरोडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना मार्गदर्शन करताना दिला. भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक संकुलात शिक्षणासाठी आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांशी घनशाम दरोडे संवाद साधत असताना बोलत होता. यावेळी बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, दत्तात्रय दरोडे, जीजाराम डोके, शांतीलाल बेारा, साळुंखे, वैभव चेारडिया, प्राचार्य संतोष भंडारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. घनश्याम म्हणाला, जगात पुढे जायचे असेल तर गुरुंचे आशिर्वाद महत्वाचे आहे. खचुन जाउ नका. जे सरकारने केले नाही. ते आपण करु. खेळात सहभागी व्हा. प्रगती केल्याशिवाय काही नाही. रडल्याने ते परत येणार नाहीत. मात्र दु:खाचा डोंगर जरी कोसळला असला तरी आई-वडीलाना न्याय मिळवून द्यायचा असेल तर संकटाला हसत खेळत सामेारे जा. शेतकरी आत्महत्या कश्या प्रकार रोखता येतील याचा प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे़ त्यासाठी मी जिल्हाधिकारी होण्याचे ठरविले आहे त्यामुळे तुम्हीही असाच दृढ निय मनाशी बाळगला पाहिजे असे मत दरोडे याने विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी मुलानी अनेक प्रश्न घनशामला विचारले. तुमचे आदर्श कोण ? कलेक्टर का व्हायचं ? कितवी इयत्तेत आहे तुम्हाला काही अनुभव आहे का ? मुख्यमंत्री का नाही अभ्यास किती वेळ करता ? या प्रश्नाना घन:शामने बेधडक उत्तरे दिली. मुलानी जल्लोष करीत त्याचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी.आर.पवार यानी केले.