हरिश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सर्वाधिक नाेंदणीकृत आणि सुरू असलेल्या कंपन्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मात्र, कंपन्या दिवाळखाेरी निघण्याच्या बाबतीत दिल्ली आघाडीवर असून महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर येताे. गेल्या वर्षी २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यात आले हाेते. त्यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या.
प्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळखाेरी मंडळाने गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पर्यंत २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेतले हाेते. त्यापैकी १८९ कंपन्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या. त्याखालाेखाल महाराष्ट्रातील ३७ आणि गुजरातमधील ३६ कंपन्यांचा समावेश हाेता. ओडिशातील एकही कंपनी दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत नव्हती. १३८ कंपन्यांचे प्रकरण अपील किंवा पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर साेडविण्यात आले. त्यातही ३८ कंपन्या दिल्लीच्या तर २० कंपन्या महाराष्ट्राच्या हाेत्या.
७६ प्रकरणांचा निपटाराnया कंपन्यांपैकी ७६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातही १९ कंपन्या दिल्लीतील तर महाराष्ट्रातील १६ कंपन्या हाेत्या. nसरकारने दिवाळखाेरी कायद्यांतर्गत एनपीएची मर्यादा एक काेटी रुपयांपर्यंत वाढविली. अन्यथा एकूण कंपन्यांचा आकडा अनेक पटींनी वाढल असता.