शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

"कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत" पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे तेल कंपन्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 8:53 PM

"आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती नियंत्रणात आहेत. तेल कंपन्याही तोट्यातून सावरल्या आहेत."

नवी दिल्ली- 9 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीची चर्चा सुरू झाली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. ते रविवारी म्हणाले - आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती नियंत्रणात आहेत. तेल कंपन्याही तोट्यातून सावरल्या आहेत, त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत अशी माझी विनंती आहे. बनारसमधील गंगा घाटावर सीएनजी बोट रॅलीमध्ये ते बोलत होते.

काही राज्यांना लक्ष्यहरदीप पुरी यांनी व्हॅट कमी न केल्याबद्दल काही राज्यांनाही लक्ष्य केले. पुरी म्हणाले- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती वाढत असतानाही केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते, परंतु काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही. त्यामुळे त्या राज्यांमध्ये तेलाच्या किमती अजूनही चढ्या आहेत. 

9 राज्यांमध्ये निवडणुका यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील. तर कर्नाटक, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्येही या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत.

लोकसभेची सेमीफायनलया निवडणुकांकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे, तर नागालँड, मेघालय आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे, परंतु भारतीय जनता पक्ष तेथे मित्रपक्ष आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आहे आणि केसीआरचा पक्ष बीआरएस तेलंगणात सत्तेत आहे.

याशिवाय सरकारची इच्छा असेल तर जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होऊ शकतात. तेथे राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. अशा स्थितीत दहा राज्यांचे हे निवडणूक वर्ष आहे, असे म्हणता येईल. डिझेल-पेट्रोलचे दर हा निवडणुकीत मोठा मुद्दा असतो, अशा परिस्थितीत सरकार इंधनाच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरतात?जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर निश्चित करायचे, पण 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. तसेच ऑक्‍टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दर सरकारच्या हातात होते, पण 19 ऑक्‍टोबर 2014 पासून हेदेखखील काम सरकारने तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेल