नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, अशा आशयाच्या पुस्तकाचे आज दिल्ली येथील भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यांनतर भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला मात्र सोशल मिडियावरून विरोध होत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. तर मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.