नवी दिल्ली, दि. 22 - देशातील गोरक्षकांच्या हिंसाचारात ज्या पीडित व्यक्तींचे नुकसान झाले आहे, त्यांची नुकसान भरपाई संबंधीत राज्यांनी करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या आहेत, याबाबत राज्य सरकारांना म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच, हल्ले करणा-या गोरक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जावी, असेही कार्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.
गोरक्षकांच्या हिंसाचारातील पीडितांना नुकसानभरपाई द्या - सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 8:42 PM