नवी दिल्ली - येडियुरप्पा मुख्यमंत्री असतानाच्या भाजपा सरकारमध्ये जो भ्रश्टाचार झाला, त्याच्याशी आम्ही बरोबरी करू शकतच नाही. तुरुंगाची हवा खाल्लेल्या नेत्याला भाजपा आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करते, याचाच अर्थ भाजपाचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे, असा होतो, अशी सडकून टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आम्ही भाजपाच्या भ्रष्टाचाराशी स्पर्धा करूच शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळातील कृष्णा शेट्टी हेही तुरुंगात होते आणि रेड्डी बंधूंचा ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा येडियुरप्पांच्या आशीर्वादानेच झाला. त्याबद्दल रेड्डी बंधू व येडियुरप्पा यांना तुरुंगात जावे लागले. तरीही येडियुरप्पा आज रेड्डी बंधूंची निवडणुकीत मदत घेत आहेत, त्यांचे उघडपणे मुलाखतींमधून समर्थन करीत आहेत, याचा उल्लेख राहुल यांनी केला.कामाचा लेखाजोखासिद्धरामय्या यांच्या काळात ५३ लाख रोजगार निर्माण झाले, शेतकऱ्यांचे १२ हजार कोटींचे दिले, त्यांचे नम्मा मेट्रोचे काम पूर्ण केले, गरिबांसाठी साडेपंधरा लाख घरे बांधून दिली, या बाबींचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
भाजपाच्या भ्रष्टाचाराशी स्पर्धा अशक्यच - राहुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:33 AM