शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल

By admin | Published: October 13, 2015 4:13 AM

गोव्यात राजरोसपणे मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत

पणजी : गोव्यात राजरोसपणे मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. रायबंदर-पणजी येथे क्राईम ब्रँचच्या कार्यालयात गुन्हा नोंद झाला आहे. गोव्यात राजरोसपणे मटका जुगार चालत असतानाही पोलीस कारवाई करत नाहीत. राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगार चालकांना कोणाचेही भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. मटक्याच्या जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, तरुण पिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यानुसार ११०० मटका बुकी, ‘कल्याण’, ‘मिलन’, ‘स्टार’ आदी नावांनी मटक्याचे रॅकेट चालविणारे गुजरातमधील मटकाचालक, निनावी राजकारण्यांसह ‘पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर भा.दं.वि. कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगारविरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)