ऑनलाइन लोकमत
बाघपथ, दि. ३१ - एखादा दिवस आपल्याला आंघोळीशिवाय काढावा लागला तर, आपल्यालाच आपली अस्वच्छता वाटू लागते. कुठलेही काम करताना उबग येतो. पण एखादी व्यक्ती महिनोनमहिने आंघोळीशिवाय सहजतेने काढत असेल तर....?
उत्तरप्रदेशच्या बाघपथमध्ये एका महिलेने स्वत:च्याच पतीविरोधात महिनोनमहिने आंघोळ करत नसल्याबद्दल पोलिसात तक्रार नोंदवली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जेव्हा या महिलेने कुटुंबियांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले. तेव्हा कुटुंबाने तिच्याकडे दुर्लक्ष केले व तिला नको तिथे लक्ष घालू नकोस असे सुनावले. नव-याच्या कुटुंबाने मागच्यावर्षी दिवाळीत त्यानंतर पाच महिन्यांनी होळीमध्ये आंघोळ केली असे या महिलेने म्हटले आहे. एसपी शंकर यांनी ही तक्रार महिला शाखेकडे पाठवली आहे. जेणेकरुन लवकरात लवकर या प्रकरणावर काहीतरी तोडगा निघेल.