नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींबाबत कोणतीही माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. याबाबत व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावणारे आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला होता.सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केंद्रीय खाण व कोळसा खात्याचे राज्यमंत्री हरिभाई पटेल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी केला होता, असा आरोप सीबीआयचे अधिकारी मनीषकुमार सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केलाआहे.कागदपत्रे ठिकठिकाणीयाआधी संजीव चतुर्वेदी यांनी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) भ्रष्टाचाराची काही प्रकरणे मुख्य दक्षता अधिकारी या नात्याने उजेडात आणली होती. पंतप्रधान कार्यालयाने चतुर्वेदी यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, मंत्र्याविरोधातील आलेल्या तक्रारींची कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवलेली नसून, ती या कार्यालयातील विविध विभागांत विखुरलेली आहेत. त्यातील काही तक्रारी भ्रष्टाचार व काही अन्य प्रकरणांबाबत आहेत. त्यांची माहिती देण्यावर लक्ष केंद्रित केले, तर पंतप्रधान कार्यालयाच्या नियमित कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
मंत्र्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी; माहिती देण्यास पीएमओचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 5:47 AM