शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलचं फर्मान

By admin | Published: April 18, 2017 9:00 PM

IIT दिल्लीतील एका गर्ल्स होस्टेलने मुलींना ड्रेस कोडच्या नावाखाली पूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याची नोटीस बजावली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - संस्कृतीच्या नावाखाली ब-याचदा मुलींना पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा यासाठी कॉलेज आणि शाळेतही पूर्ण अंग झाकणा-या गणवेषाची सक्ती केली जाते. त्याप्रमाणेच IIT दिल्लीतील एका गर्ल्स होस्टेलने मुलींना ड्रेस कोडच्या नावाखाली पूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याची नोटीस बजावली आहे. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या हाऊस-डेसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला. या ड्रेस कोडनुसार होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना या दिवशी अंगभर कपडे असावेत, अशा प्रकारचं नोटीस बजावण्यात आलं आहे. या ड्रेस कोडच्या केलेल्या सक्तीमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावरूनही IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे.  
IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलमध्ये दरवर्षी हाऊस डे साजरा केला जातो. या दिवशी होस्टेलबाहेरील मित्र आणि नातेवाईकांना एका तासासाठी आमंत्रित करण्याची सूट विद्यार्थ्यांना देण्यात येते. यंदाच्या वर्षी 20 एप्रिल हा दिवस हाऊस डेसाठी निवडण्यात आला असून, विद्यार्थिनींसाठी अंगभर कपडे घालण्याचा ड्रेस कोड लागू करण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलच्या आदेशानुसार पूर्ण अंग झाकेल, असा इंडियन आणि वेस्टर्न ड्रेस घालावा लागणार आहे. ड्रेसबाबत सभ्यतेचे पालन व्हावे, असेही नोटिशीत बजावण्यात आले आहे. IIT दिल्ली हिमाद्री होस्टेलने ड्रेस कोडची सक्ती केली आहे. विद्यार्थिनींना ड्रेस कोडची केलेली सक्ती "पिंजरा तोड ग्रुप"ने सोशल मीडियावर शेअर केली असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थिनींसाठी ही नोटीस म्हणजे मॉरल पोलिसिंगचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. "विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोड ठरवण्याची एवढी घाई कशासाठी?", असा सवालही या ग्रुपने उपस्थित केला आहे.