शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

कागद उद्योगासाठी व्यापक व्यवसाय मंच

By admin | Published: November 03, 2015 2:01 AM

कागद उद्योगासाठी पेपरेक्स आता एकमेव व्यापक मंच बनलेला आहे. याच कारणांमुळे देशाच्या कागद उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पेपरेक्स व्यवसाय उत्सवाच्या

नवी दिल्ली : कागद उद्योगासाठी पेपरेक्स आता एकमेव व्यापक मंच बनलेला आहे. याच कारणांमुळे देशाच्या कागद उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पेपरेक्स व्यवसाय उत्सवाच्या रूपात स्थापित झालेला आहे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल ट्रेड एक्झिबिशन इंडियाचे (आयटीई इंडिया) प्रबंध संचालक उडो शुइर्ट्जमन यांनी केले आहे. उडो शुइर्ट्जमन हे आयटीई आणि अन्य १२ व्यापारी संघटनांतर्फे नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित ‘१२ व्या पेपरेक्स २०१५’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा शुभारंभ उडो शुइर्ट्जमन यांच्यासोबतच उद्योगपती हर्षपती सिंघानिया आणि गौतम थापर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी अवंता समूहाचे चेअरमन आणि संस्थापक गौतम थापर म्हणाले, ‘प्रदीर्घ काळापासून कागद उद्योग गुंतवणूकदार, तंत्रज्ञान विशेषज्ज्ञ आणि जगाच्या विविध भागांतून व्यापारी वर्गाला आकर्षित करीत आला आहे. या परिवर्तनामुळे अर्थव्यवस्था हवामान बदल आणि वातावरणात सुधारणा होईल. सोबतच सरकार सकारात्मक अर्थव्यवस्था आणि दीर्घकालीन स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्पष्ट धोरण तयार करेल, अशी आशा आहे.’उद्योगपती हर्षपती सिंघानिया म्हणाले, ‘कागद उद्योग कच्च्या मालासाठी एक झाड तोडण्यात आल्याच्या बदल्यात सहा झाडे लावून पर्यावरणाला अनुकूल अशी भूमिका पार पाडत आहे. व्यापारी समुदायासाठी अशाप्रकारचे आयोजन फार महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. कारण यातून विकास, स्थैर्य, समावेश आणि रोजगाराभिमुख वृद्धी व विकास साध्य करण्यात मदत मिळेल. हे प्रदर्शन एसएमई निर्यातदार, गुंतवणूकदार आणि उद्योगपतींसह अन्य सर्व पेपर उद्योगाशी संबंधित घटकांसाठी विश्वसनीय मंच उपलब्ध करून देते.’या ‘पेपरेक्स २०१५’ प्रदर्शनात इंटरनॅशनल पेपर, ट्रायडेंट, बिल्ट, सेंच्युरी वोईथ, वेलमेट अँड्रिज आणि जेके पेपर यांसारखे नामवंत ब्रॅण्ड भाग घेत आहेत. त्याशिवाय ३३ देशांच्या ५४५ प्रदर्शकांनीही येथे आपापले स्टॉल लावले आहेत. या प्रदर्शनाला ५५ पेक्षा जास्त देशांचे २५ हजार लोक भेट देतील, अशी आशा आहे. आयटीए प्रदर्शनातून वैश्विक माहितीआयटीए समूह दरवर्षी पेट्रोलियम खनन, निर्माण सामग्री, पर्यटन यांसह२० उद्योगांशी संबंधित २५० पेक्षा जास्त प्रदर्शनांचे आयोजन करीत असते. आयटीए समूह जगभरातील ३० कार्यालये आणि एक हजार कर्मचाऱ्यांसोबत आपला व्यवसाय करीत आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून वैश्विक विशेष तज्ज्ञता, स्थानिक बाजारपेठेची माहिती आणि ग्राहक सेवेचे उच्च मापदंड याबाबत माहिती पुरविण्यास साहाय्य केले जाते. आयटीए समूहाचे बाजारातील भांडवल ४० कोटी स्टर्लिंग पौंड आहे. हा समूह लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्येही सूचीबद्ध आहे.