शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चानाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सेंट्रल किचन पद्धतीने काम देण्याच्या निर्णयाविरुद्ध नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा सोमवारी (दि. २३) दुपारी दोन वाजता बी.डी. भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.पावसापूर्वीची कामे त्वरित सुरू करावीनाशिक : पावसापूर्वीची वीज मंडळाची कामे त्वरित करावी, अशा मागणीचे निवेदन वीज मंडळ अभियंत्यांना देण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी वृक्षांची बेसुमार वाढ झाली असून काही ठिकाणच्या वीज तारा बदलायचीदेखील आवश्यकता निर्माण झाली आहे.धोकादायक वाड्यांना महापालिकेकडून नोटीसनाशिक : महापालिकेतर्फे पावसाळीपूर्व कामे करण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे नालेसफाईंच्या कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे धोकादायक दोनशे वाड्यांना महापालिकेतर्फे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.जनसेवकतर्फे ताक वाटप उपक्रमनाशिक : उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांची तहान शमविण्याच्या हेतूने इंदिरानगर येथील जनसेवक प्रतिष्ठानतर्फे ताक वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत हा उपक्रम राबविण्यात येतो.रस्त्यावरील माती काढण्याची मागणीनाशिक : त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल परिसरात ठिकठिकाणी माती साचल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मायको सर्कलप्रमाणेच डीजीपीनगर तसेच त्रिमूर्ती चौक परिसरात याचप्रकारे माती साचल्याचे चित्र बघायला मिळते.बी. डी. भालेकर मैदान अस्वच्छतेच्या गर्तेतनाशिक : शालिमार परिसरातील बी. डी. भालेकर मैदानाला अस्वच्छतेने ग्रासले असून येथील पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचल्या असून याठिकाणी डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. याठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.शहरातील रस्ते डांबरीकरणाची मागणीनाशिक : शहर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून तातडीने हे रस्ते डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच वाहनचालकांना मणकेदुखीने त्रस्त केले आहे.विहितगाव परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाटनाशिक : विहितगाव परिसरातील हांडोरेमळा परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातून पकडून आणलेली कुत्री याठिकाणी सोडण्यात येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.रिक्षाचालकांकडून थांब्यांची निर्मितीनाशिक : शहर परिसरात अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी कोणतीही परवानगी न घेता तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून रिक्षा थांबे निर्माण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक प्रशासनाने अशा थांब्यांबाबत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.दुभाजक सुशोभिकरणात प्रशासन नापासनाशिक : शहरातील विविध रस्त्यांचे रूप बदलले असले तरी रस्तांच्या दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या वृक्षवल्लीची दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारकांनी नाराजी दर्शवित दुभाजक सुशोभिकरणाची मागणी होत आहे.गोदाघाटावर टरबूज विके्रत्यांचे अतिक्रमणनाशिक : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहरात टरबूज विक्रेत्यांची संख्या वाढू लागली असतानाच गोदाघाटावर या टरबूज विक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. गाडगे महाराज पुलाखालीही समस्या तीव्रतेने जाणवत असून या टरबूज विक्रेत्यांना हटविण्याची मागणी होत आहे.
संक्षीप्त पा
By admin | Published: May 22, 2016 7:39 PM