निलंबन मागे घेण्यात तडजोडीचे राजकारण?
By admin | Published: November 05, 2015 11:29 PM
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्यांवर मात्र अन्याय झाल्याची भावना पोलीस दलात निर्माण झाली आहे. दरम्यान, या अन्याय झालेल्या २९ कर्मचार्यांपैकी काहींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या प्रकाराची माहिती कथन केली.
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्यांवर मात्र अन्याय झाल्याची भावना पोलीस दलात निर्माण झाली आहे. दरम्यान, या अन्याय झालेल्या २९ कर्मचार्यांपैकी काहींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या प्रकाराची माहिती कथन केली. तपास सुरु असतानाच जीवन पाटीलचे निलंबन मागे निलंबन मागे घेण्यात आलेल्या बारा कर्मचार्यांमध्ये सादरे प्रकरणात आरोपी असलेल्या जीवन पाटील यांचाही समावेश आहे. पाटील हे सादरे यांचे विश्वासू व जवळची व्यक्ती होती. आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असताना रामानंद नगर पोलीस स्टेशनला जावून वाळूमाफिय सागर चौधरीचे डंपर सोडण्यासाठी जीवन पाटील सादरे यांच्याकडे गेल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले होते. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरुच आहे. न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले नाही असे असतांना जीवन पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची घाई का करण्यात आली असा सवाल आता विचारला जात आहे. सोयीच्या जबाबासाठी खटाटोप जीवन पाटील हे सादरे यांचे विश्वासू व त्यांच्याकडे काही माहिती असल्याने त्याचे बींग फुटू नये यासाठीच पोलीस अधीक्षकांनी खटाटोप करुन जीवन पाटील यांचे निलंबन मागे घेतले. आपल्या बाजुने जबाब द्यावा यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी पाटील यांची मनधरणी केली. त्यानुसार जीवन पाटील यांची एकदा नाशिकवारीही झाली आहे. पाटील यांचे निलंबन मागे घेतांना तपासाधिकार्याचाही अभिप्राय घेण्यात आलेला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इन्फो.. माहिती देण्यास सुपेकरांचा नकार पोलीस दलात ४१ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचार्यांची नावे व १२ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेतांना काय निकष लावला व अन्य २९ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्यात काय अडचण होती याबाबत पोलीस अधीक्षक सुपेकर यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यात नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार २९ कर्मचार्यांवर या १२ जणांपेक्षा सौम्य आरोप आहेत. एकट्या पाटीलसाठी १२ जणांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचीही चर्चा आहे.