नवी दिल्ली - राजस्थान सरकारने (Rajasthan Government) 2020-21 च्या अर्थसंकल्पात संगणक शिक्षक (Computer teachers) कॅडर तयार करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संगणक पदवीधारकांना आनंद झाला होता. सरकारी नोकरी मिळणार म्हणून अनेकजण यासाठी तयारीला लागले होते. मात्र आता राजस्थान सरकारनं यावर घुमजाव केलं आहे. संगणक शिक्षक या नियमित (Permanent) पदासाठी आधी अर्ज मागवण्यात येणार होते. मात्र सरकारच्या नवीन घोषणेनुसार ही पदं कॉन्ट्रॅक्टवर (Contract) असणार आहे. यामुळे संगणक पदवीधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
राजस्थानमधील (Rajasthan) संगणक पदवीधारकांना (Computer Degree holders) नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेस मुख्यालयासमोर (Congress Head Office) कोंबडा बनण्याची वेळ आली आहे. काही युवा संगणक पदवीधर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करत आहेत. कधी शाळेतील शिक्षेप्रमाणे कोंबडा बनत तर कधी दुसऱ्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टवरील ही पदं नियमित (Permanent) करण्यात यावी मागणीसाठी या पदवीधारकांनी राजस्थान सरकारपासून ते गांधी परिवारापर्यंत सर्वांकडे याबाबत मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka gandhi) यांनी उत्तर प्रदेशातील अशाच एका मुद्द्यावर टीका केली होती, मात्र आता राजस्थानमध्ये संगणक पदवी धारकांवर अन्याय होत असताना प्रियंका गांधी शांत का आहेत? हा बेरोजगारांचा अपमान आहे असं या संगणक पदवीधारकांचं म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून हे पदवीधर इथे आंदोलन करत आहेत, त्यांनी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांची भेट घेऊन याबद्दल मागणी केली आहे, मात्र यावर अजून काही स्पष्टता नाही अशीही माहिती या पदवी धारकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल"
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. "संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल" असं म्हणत निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे.