शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘कॉम्रेड’, ‘लाल सलाम’; आसामच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध फेसबुकवर तीव्र रोष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:18 AM

शेतकरी नेते गोगोई यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपामुळे प्रतिक्रिया

गुवाहाटी : शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्याविरोधात ‘एनआयए’मार्फत देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांविषयीचे आरोपपत्र दाखल केल्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर तीव्र रोष व्यक्त होत आहे. सोनोवाल यांना ‘कॉम्रेड’ म्हणत ‘लाल सलाम’ करण्यात येत आहे. फेसबुकवर ते अधिक ट्रोल होत आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयएने गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, गोगोई यांना ‘कॉम्रेड’ म्हणून ‘लाल सलाम’ केला जात होता. या दोन्ही संबोधनावरून गोगोई हे राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे स्पष्ट होते.

आरोपपत्रातील तपशील बाहेर आल्यानंतर लोकांनी सोनोवाल यांनाही ‘कॉम्रेड आणि ‘लाल सलाम’ असे संबोधित करून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ४ जूनपासून मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याविरुद्ध टीका सुरू झाली. मागील दोन-तीन दिवसांत टीका अधिक तीव्र झाली आहे. सोनोवाल यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘कॉम्रेड’, ‘लाल सलाम’, ‘इन्क्लाब जिंदाबाद’ आणि व्लादिमीर लेनिन यासारख्या कम्युनिस्ट विचारांचा संदर्भ दिला जात आहे.राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २९ मे रोजी गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आसामात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात गोगोई यांची सक्रिय भूमिका होती, असा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांची कलमे लावण्यात आली आहेत. आरोपपत्रातील तपशील जाहीर झाल्यानंतर सोनोवाल यांच्या फेसबुक पेजवर विभिन्न प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.एका व्यक्तीने लिहिले की, ‘आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी’ आहोत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही स्वातंत्र्यसैनिकांना समर्थन दिले होते. आरएसएस आणि भाजपने मात्र इंग्रजांना साथ दिली होती.’कॉम्रेड संबोधतात म्हणून देशद्रोहीच्आरोपपत्रात म्हटले आहे की, गोगोई आणि त्यांच्या साथीदारांनी कम्युनिस्ट जाहीरनामा, मार्क्स आणि माओच्या जीवनाचा उल्लेख केला आहे. ते मित्रांना कॉम्रेड संबोधतात तसेच अभिवादनासाठी लाल सलाम म्हणतात. यावरून त्यांचे प्रतिबंधित भाकपा (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीSocial Mediaसोशल मीडिया