जयपूर : कंडोमची जाहिरात खूप अश्लील असते़ ती कुटुंबासोबत पाहण्याजोगी नसते. सुखाचे साधन म्हणून कंडोमची जाहिरात केली जाते़ गर्भनिरोधकासाठी ही जाहिरात नसते, असे परखड मत राजस्थान उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे़माहिती व प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहिरात रात्री १० ते सकाळी ६पर्यंत दाखवावी, असे फर्मान जारी केले़ ग्लोबल अलायंस फॉर ह्युमन राईटस् या संघटनेने याविरोधात याचिका दाखल केली़न्या़ गोपाल कृष्ण व न्या़ जी़ आऱ मुलचंदानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेले फर्मान गैर आहे़ कंडोम कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे़ एड्सचा प्रचार व प्रसार रोखण्यासाठीही याने अडथळा निर्माण होत आहे, असा दावा संस्थेचे वकील प्रतीक जैसवाल यांनी केला़तो न्यायालयाने फेटाळून लावला़ स्वातंत्र्याआधी देशाची लोकसंख्या ४५ कोटी होती़ आता लोकसंख्या १़३ अब्ज झाली आहे़ लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना कशा प्रकारे तुम्ही वाढती लोकसंख्या रोखू शकता, असा सवाल न्यायालयाने केला़मुळात कंडोमचा शरीरसुखासाठी वापर करावा की नाही? याच्याशी संस्थेचा काहीही संबंध नाही़ शरीरसंबंधाद्वारे पसरणाऱ्या आजारांना निर्बंध घालणे हा संस्थेचा उद्देश आहे़ कंडोमची जाहिरात रात्री १०नंतर दाखविल्यास व या जाहिरातींना निर्बंध घातल्यास नेमका काय अडथळा निर्माण होऊ शकतो, हे याचिकाकर्त्याने स्पष्ट केले नाही, असे नमूद करीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली़