कोलम (केरळ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केरळमधील कोलम येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी शबरीमाला प्रकरणी भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत आहे, असे सांगितले. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले. याप्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी होती, अशी टीका मोदींनी केली. मोदी म्हणाले, ''संपूर्ण देश गेल्या काही काळापासून शबरीमला मंदिराची चर्चा करत आहे. शबरीमला प्रकरण हाताळताना केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने केलेले इतिहासात सर्वात लाजिरवाणे म्हणून ओळखले जाईल. डावी मंडळी भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचा सन्मान करत नाही हे आम्हाला माहीत होते. मात्र याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेश असेल असे वाटले नव्हते.''
शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 8:41 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले.
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शबरीमाला प्रकरणी भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत शबरीमलाप्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी