ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 25- जम्मू काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करताना जीवंत पकडलेला दहशतवादी अब्दुल कयूम याने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानी असल्याचं देखील त्याने मान्य केलं आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी अखनूर येथून अब्दुल कयूममला अटक केली होती. यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला असून भारताच्या हाती जिवंत पुरावा लागल्याने पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे ठरणार आहेत.
कयूम हा पाकिस्तानमधील सियालकोटचा रहिवासी आहे. १२ वी पर्यंत शिकलेला कयूम हा १६ व्या वर्षांपासून कट्टरतावादाकडे झुकला. त्याच्याकडून एक मोबाईल आणि दोन सिम कार्डही जप्त करण्यात आले. बीएसएफने कयूमची कसून चौकशी करत आहेत.पाकिस्तानमधील मानसेरा कॅम्पमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेत असल्याची कबुली या दहशतवाद्याने दिली आहे. दरम्यान, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत दोघा जणांना सैन्याने शनिवारी अटक केली आहे. एहसान कुर्शीद आणि फैजल हुसैन अशी या दोघांची नावे आहेत.