नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे, अशी व्युत्पत्तीे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी काढली.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरकारने अतिरेक्यांविरुद्ध अधिक प्रभावी कारवाई केली असे सांगताना ही आकडेवारी दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘संपुआ’ सरकारच्या काळात सन २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे ६७ व ७२ अतिरेकी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले होते. या उलट ‘रालोआ’ सरकार आल्यापासून सन २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१७ तर यंदाच्या मेपर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले.प्रसाद यांच्या या दाव्याचा प्रतिवाद करताना अब्दुल्ला यांनी टष्ट्वीट केले की, मंत्री महोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दिलेली ही आकडेवारी खरे तर त्यांच्या सरकारचे अपयश दाखविणारी आहे. त्यांच्या काळात काश्मिरमध्ये जास्त दहशतवादी मारले गेले याचादुसरा अर्थ पूर्वीपेक्षा जास्त अतिरेकी आले असा होतो. यावरून ‘रालोआ’ सत्तेत आल्यापासून येथील दहशतवाद व हिंसाचार खरे तर वाढला हेच यावरून दिसते. (वृत्तंसस्था)
काश्मीरमध्ये दहशतवाद वाढल्याची ही तर कबुली!, भाजपाला दिले प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:39 AM