व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास व प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे : महेश काकडे
By admin | Published: January 21, 2017 2:10 AM
गारगोटी : व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास व प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. यासाठी स्वनियंत्रण महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी अंतरप्रेरणा जागृत ठेवावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले. ते विद्यावर्धिनी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नोलॉजी, पाल येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, उद्योजक आय. ए. पाटील, संजीव तूनगटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गारगोटी : व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास व प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. यासाठी स्वनियंत्रण महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी अंतरप्रेरणा जागृत ठेवावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले. ते विद्यावर्धिनी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नोलॉजी, पाल येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, उद्योजक आय. ए. पाटील, संजीव तूनगटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काकडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यावर्धिनी कॉलेजच्या उपक्रमांची प्रशंसा केली. ग्रामीण भागात विद्यावर्धिनी नक्कीच आदर्शवत ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्योजक आय. ए. पाटील यांनीही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जागतिक मंदीचा विचार न करता विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा. त्यासाठी आपली मानसिकता तयार ठेवावी, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रमुख इंजि. एम. पी. बाउस्कर, संस्था प्रतिनिधी डी. वाय. देसाई, एन. एस. हिरुगडे, आदी प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य डी. बी. केस्ती यांनी प्रास्ताविक, तर उपप्राचार्य डी. व्ही. रेपे यांनी आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटा ओळ - विद्यावर्धिनी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नोलॉजी पाल येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना महेश काकडेंसह मान्यवर उपस्थित होते.फोटो- २० गारगोटी विद्यावर्धिर्नी कॉलेज